Ladki Bahin Yojana Status Check 2026 | महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात दरमहा आनंदाचा वर्षाव करणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या एका महत्त्वाच्या वळणावर आली आहे. जर तुम्हीही या योजनेचे लाभार्थी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण, एका छोट्याशा तांत्रिक चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे तुमच्या हक्काचे पैसे कायमचे थांबण्याची भीती निर्माण झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
राज्य सरकारने या योजनेचा लाभ पारदर्शकपणे मिळावा यासाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली होती. याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ होती. ज्या भगिनींनी या मुदतीत आपली ई-केवायसी पूर्ण केली नाही, त्यांचे जानेवारीपासूनचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. अनेक महिलांना तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहितीअभावी ही प्रक्रिया करता आली नाही, पण आता त्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
चुकीने ‘अपात्र’ ठरलेल्या महिलांसाठी आशेचा किरण!
काही महिलांनी ई-केवायसी तर केली, पण फॉर्म भरताना मोठी गडबड झाली. घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीत नसताना, चुकून ‘हो’ असा पर्याय निवडला गेला आणि सिस्टीमने त्यांना ‘अपात्र’ ठरवले. अशा माझ्या लाडक्या बहिणींना आता घाबरण्याचे कारण नाही.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठा दिलासा दिला आहे. ई-केवायसी मधील चुका दुरुस्त करण्यासाठी आता ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही तुमच्यासाठी ‘शेवटची संधी’ आहे, हे लक्षात ठेवा.
काय करावे लागेल?
जर तुमच्या अर्जात काही चूक झाली असेल किंवा पैसे येणे बंद झाले असेल, तर त्वरित खालील गोष्टी करा:
योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (ladakibahin.maharashtra.gov.in) जा.
तुमचा अर्ज तपासा आणि जिथे चूक झाली आहे तिथे दुरुस्ती करा.
स्वतः जमत नसेल तर जवळच्या अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र किंवा सरकारमान्य केंद्रावर जाऊन मदत घ्या.
सावधान! घरी येऊ शकते चौकशी पथक
सरकार आता केवळ ऑनलाइनवर अवलंबून राहणार नाही. काही संशयास्पद अर्जांची पडताळणी करण्यासाठी अधिकारी थेट तुमच्या घरी येऊ शकतात. जर कोणी चुकीची माहिती देऊन लाभ घेत असेल, तर त्यांचा लाभ कायमचा रद्द केला जाणार आहे. त्यामुळे माहिती देताना ती खरी आणि अचूक द्या.